BUSINESS TIPS IN MARATHI.

 BUSINESS TIPS IN MARATHI 



BUSINESS TIPS IN MARATHI


1]अश्या लोकांना कधीही पैसे उधार देऊ नका. 
1) ज्याच्याकडे पैसे कमावण्याचे माध्यम नाहीये. 
2) जो खूपजनांकडून पैसे उधार घेतो. 
3) जो वेळेवर घेतलेले पैसे परत करत नाही. 
4) जो पार्टी मौजमजा करण्यासाठी पैसे मागतो. 
5) जो आज उद्या सांगून पाठ फिरवतो. 


दिव्यांगांना पाच लाखांपर्यंत कर्ज ! हि शासनाने स्कीम चालू केली आहे. :--

 दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध व्हावे, त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळातर्फे पात्र दिव्यांगांना विविध योजनांतर्गत कर्जपुरवठा करण्यात येतो. दिव्यांगांना पाच दोन वर्षांत, लाखांपर्यंत कर्ज
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळासह राज्य व केंद्र शासनाच्या योजनाही राबविण्यात येतात. महामंडळातर्फे पाच लाखांपर्यंत कर्जपुरवठा करण्यात येतो.

पण शासनाकडे या स्कीमसाठी काहीच प्रस्ताव आलेले नाहीत. 
मागील दोन वर्षात या महामंडळाकडे एकाही लाभार्थ्यांने कर्जासाठी प्रस्ताव सादर केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील कर्जाच्या वसुलीत कर्मचारी गुंतले असल्याचे चित्र आहे.
एक कोटी रुपये थकीत कर्ज येथील कार्यालयाकडून जिल्ह्यातील काही पात्र लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करण्यात आला होता. ३१ मार्च २०१८ पर्यंत दीर्घ- मुदतीचे कर्ज अनेकांकडे बाकी असून ही थकबाकी एकूण एक कोटी रुपयांच्या आसपास आहे.

काय आहे पात्रता ?
लाभार्थी किमान ४० टक्के दिव्यांगत्व असलेला असावा. किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वय १८ ते ६० वर्षे असावे. कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
हि माहिती लोकमत मध्ये १६ मे २०२३ च्या पेपर मध्ये आलेली आहे. तरी गरजवंतांनी याचा आवश्य लाभ घ्यावा. 

Comments