125 GREAT THOUGHTS IN (MARATHI) POST #4.
SUVICHAR.
HAND PICKED QUOTES.
2) काळजी केल्याने उद्याचे दुःख कमी होत नाही , उलट आजच्या दिवसाची ताकद नष्ट होते.
3) आनंदी वृत्ती हा आरोग्याचा आधार आहे, तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे.
4) व्यक्तीचे यश हे कोणाच्या आधारावर नव्हे, तर चांगल्या विचारावर अवलंबून असते. कारण आधार कायम सोबत नसतो, मात्र चांगले विचार कायम बरोबर असतात.
5) संधी कधीच चालून येत नाही. तर ती आपल्याला निर्माण करावी लागते.
****मुलांवर गृहपाठ, अभ्यासाचा ताण आणि त्याच्याबरोबर शाळा, समाज, पालक यांच्या अपेक्षांचे ओझे थोपवले जाते. तथापि, दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक अनेक बाबींची त्यांना
ओळख, माहिती आणि उपयुक्तता पटवून देणेही गरजेचे असते. नेमके त्याकडे दुर्लक्ष करून बालमन आपण कोमेजून टाकतो.
6) कधी कधी मोठ्यांनी छोटेपना आणि छोट्यांनी मोठेपणा दाखविल्यास नात्यांमधील आदर आणखी वाढतो.
7) विश्वास ठेवा, आपण जेंव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेंव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं.
8) समस्या हि कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते. जे फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना ती जड वाटते, पण जे ती हाताळतात त्यांनाच खरे वास्तव कळते.
9) माणसाला अलार्म नाही तर जबाबदाऱ्या जागं करतात.
10) संघर्षाला संयमाची साथ मिळाली कि यशप्राप्ती नक्कीच मिळतेच.
11) प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ चांगला करणारे अनेकजण या जगात आहेत; पण मी शेवट सुंदर करतो.
--- उसेन बोल्ट.
12) थेम्ब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते.
13) आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही.
14) ज्यांना स्वतःच्या कर्मावर विश्वास असतो, ते नशिबाला भीक घालत नाहीत.
15) तुमच्याने पुढे जात येत नसेल तर जाऊ नका, पण पुढे जाणार्यांना मागे खेचू नका.
16) मनाला आनंद देणारी प्रत्येक कृती व वस्तू हि कलापूर्ण असते.
17) जिभेचा वजन खूप कमी असते पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत .
18) सदगुनांच्या खाणी जवळ असल्यावर अडचणी आणि अडथळे कधीच पार करता येतात.
19) संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होय.
20) मी परीक्षेत काही विषयात नापास झालो होतो पण माझा मित्र सर्व विषयात पास झाला होता. तो आज मायक्रोसॉफ्ट चा अभियंता आहे आणि मी मालक. ---- बिल गेट्स
21) खरा मित्र तोच जो तुम्हाला तुम्ही कोण व काय आहात याची जाणीव निःसंकोचपणे करून देत असतो...
आणि तुम्हाला आयुष्यात जास्त चांगला माणूस बनण्यास मदत करीत असतो.
22) शेवटच्या घावात दगड तुटतो.. याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्त्वाचे नव्हते... यश मिळविण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचाच असतो.
23) रुसलेल्या मनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात....!
म्हणूनच....
राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे....
जेणेकरून काही गैरसमज असेलच तर तो दूर होऊ शकेल.....!
24) जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
अंतकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…
25) यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानाचा सुंदर आनंद हा कस्तूरीपेक्षा मौल्यवान असतो.
26) झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुल तयार करण्यात व्यस्त असते
तसेच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवु शकतो यातच जीवनाचा खरा अर्थ कळतो.
27) काय चुकलं" हे शोधायला हवं,
पण आपण मात्र "कुणाचं चुकलं"* हेच शोधत राहतो..आपली माणस मोठी करा,आपोआप आपणही मोठे होऊ...
28) पेक्षा जास्त अनुभवी व्यक्तिबरोबर घालवलेला थोडा वेळतुमच्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो.
29) चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
30) आपल्या वाटेत कोणी खड्डा खणला तर नाराज होऊ नका कारण तेच लोक आपल्याला उंच उडी मारायला शिकवतात.
31) ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे. परंतु कुटुंब आणि मित्र हे जीवनाचे मुळ आहे.
आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो पण मुळाशिवाय उभे नाही राहू शकत कारण मुळ कुजले की मोठे वृक्षही उन्मळून पडतात तेंव्हा नाती जपा, कठीण प्रसंगी तिच कामी येतात..!!
आयुष्यात कितीही वाईट दिवस येवू द्या , कितीही वाईट संकट येवूद्या पण 'आशा' आणि 'आत्मविश्वास' या दोन गोष्टी कधीच सोडू नका...!!!
32) जीवनात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा कधीच चुकीचा नसतो,
फक्त तो योग्य असल्याचे सिद्ध करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असायला हवे, आणि प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही तो उत्तराला बरोबर घेऊनच येत असतो.
33) चेहरा बघण्यापेक्षा,
नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं...!
शरीराची सुंदरता वया बरोबर संपते...
तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते...!
34) सहनशीलता आणि हास्य यशस्वी व्यक्तीच्या अंगाचे महत्वाचे गुण आहेत कारण हास्य जीवनातील प्रश्न दिसु देत नाही आणि सहनशीलता प्रश्नच निर्माण होऊ देत नाही.
35) आपल्या चेहऱ्यावरील स्मितहास्य हे, खूप प्रभावी उत्तर असते. आपल्या विरोधात असणाऱ्या परिस्थिती आणि व्यक्ती यांच्यासाठीचे.
36) स्वतःला खुश, आनंदी, समाधानी ठेवण्याची कला आपल्याला अवगत असली पाहिजे. नसेल तर ते काम दुसऱ्याला करावे लागेल आणि तसे झाले तर आपण दुसऱ्यावर ओझं बनून राहू. कोणतीही गोष्ट ओझ्याखाली दबते, गुदमरतय मग ती वस्तू असो वा एखादे नाते.
37) तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या शेकडो गोष्टींबद्दल आभार मानण्याऐवजी कृतघ्न लोक तुम्ही केलेल्या एका गोष्टीबद्दल तक्रार करतात.
38) छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण पावसात उभे करू शकते. हा आत्मविश्वास यश मिळवून देऊ शकत नाही परंतु जीवनातील कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची शक्ती देतो.
39) कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झाले तर अलिप्त व्हावे , उपदेशक होऊ नये. ---- व पु काळे.
40) संयम, चिकाटी आणि घाम हे यशासाठी अतुलनीय संयोजन करतात. --- नेपोलियन हिल.
41) जर तुमच्या आयुष्यात कोणी अडथळे आणत असेल तर त्यांचे आभार मानायला हवे कारण ज्या बागेत माळी नाही ती बाग लवकर उध्वस्त होते. --- चाणक्य.
42) पराभवानंतरही तुमच्या चेहऱ्यावरचे हसू कामी झाले नाही, तर तुम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरून विजयी होणार हे निश्चित.
43) तर्कशास्त्र तुम्हाला A पासून B पर्यंत घेऊन जाईल पण कल्पनाशक्ती तुम्हाला सर्वत्र घेऊन जाईल.
-- अल्बर्ट आईन्स्टाईन.
44) स्वतःचे अस्तित्व निर्माण करताना अनेक अडचणी येतात, पण एकदा अस्तित्व निर्माण झाले की त्याचे रूप पाहण्यासारखे असते.
45) तुमची वृत्ती योग्य ठेवा... जगाचा विचार करू नका कारण जगाच्या नजरेत तुमच्या शंभर चांगल्या गुणांपेक्षा एक चूक मोठी दिसेल.
46) तुमच्या भूमिकेत खरे राहा.
जगाचा विचार करू नका कारण जगाच्या नजरेत एक चूक तुमच्या शंभर चांगुलपणावर भारी आहे.
47) रेझर ब्लेड तीक्ष्ण आहे परंतु झाड कापू शकत नाही; कुऱ्हाड मजबूत आहे पण केस कापू शकत नाही. प्रत्येकजण त्याच्या/तिच्या अनन्य हेतूनुसार महत्त्वाचा असतो...
48) समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे.
एखादी गोष्ट समजण्यासाठी
माणूस हुशार लागतो,
आणि समजून घेण्यासाठी चांगलं मन असाव लागत.
49) भरलेले घर आणि सुंदर मन ! हे फक्त समाधानी व्यक्तीचे असते. कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे. त्यात खुश असते , आणि इतरांचे वाईट व्हावे हा विचार करत नाही !
50) जीवन ही शर्यत नाही त्यामुळे स्पर्धेची चिंता करू नका. स्वत:ची सर्वोत्कृष्ट आवृत्ती व्हा आणि इतर प्रत्येकजण मागे पडताना तुम्हाला दिसेल.
51) नुसतं श्वास घेणं याला आयुष्य म्हणतात असं नाही, डोळ्यात काही स्वप्नं आणि मनात आशा असणं गरजेचं आहे.
52) प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाहीत.
53) यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानाचा सुंदर आनंद हा कस्तूरीपेक्षा मौल्यवान असतो.
54) आपला दर्जा उंचावण्यासाठी स्वतःच कटिबद्ध व्हा; इतरांकडून त्याविषयी अपेक्षा व्यक्त होण्याची वाट पाहू नका.
-हेन्री वार्ड बीचर, धर्मोपदेशक.
55) जीवन समजणे फार कठीण आहे. काहीजण स्वप्नांसाठी आपल्या प्रियजनांपासून दूर राहतात….आणि काही आपल्या प्रियजनांसाठी स्वप्नांपासून दूर राहतात.
56) जग फक्त त्याच्या स्वार्थाचे मित्र आहे, ते फक्त आपल्या स्वार्थाला हवे तेवढेच लक्षात ठेवते.
- हजारी प्रसाद द्विवेदी.
57) जीवनात अडचणी त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते...! आणि जबाबदारी घेणारे कधी हारात नाहीत... ते जिंकतात किंवा शिकतात...
58) परिस्थिती प्रमाणे बदलणारी माणसे संभाळण्या पेक्षा परिस्थिती बदलविणारी माणसे सांभाळा... आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही.
59) यश हे तसे सोपे असते. कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते. पण समाधान मिळवणे तसे फार कठीण असते. कारण त्याला स्वतःच्या मनाची अनुमती लागते.
60) कोणते पाऊल आयुष्यात चांगले वळण घेऊन येईल हे कधीच कळत नाही. तर चालत रहा...! आनंद जेव्हा सर्वात अनपेक्षित असतो तेव्हा येतो.
61) अडचणी या कापसाने भरलेल्या पिशवीसारख्या असतात, बघत राहिलो तर खूप जड दिसेल; आणि.. उचलला तर!! खूप हलके असेल..!!
62) प्रयत्न करणाऱ्यांच्याच चुका होतात, पण त्यातूनच अनुभव मिळतो आणि अनुभवातूनच यश मिळतं.
63) आपण चांगले आहोत म्हणून जग आपल्याशी चांगले वागेल अशी अपेक्षा कधीच बाळगू नका.
64) संधी सर्वांसाठी समान आहेत, पण फरक आहे... सकारात्मक व्यक्ती परिणाम देते आणि नकारात्मक व्यक्ती कारणे देते!
65) पैसा आपल्याला श्रीमंत बनवतो असे नाही तर साधेपणा, प्रेम, करुणा, मैत्री, मूल्ये, कुटुंब हे आपले जीवन समृद्ध बनवते.
66) सामान्य गोष्टी असामान्य पद्धतीने उत्तम करणं हेच यशप्राप्तीचं गुपित आहे.
-- जॉन डी. रॉकफलेर, प्रसिद्ध उद्योगपती व विचारवंत.
67) एखादी नवी गोष्ट तुम्ही करायला घेतली की प्रथम लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमची खिल्ली उडवतील, मग तुमच्याशी भांडतील. त्यानंतर अखेरीस तुम्ही जिंकता.. त्यानंतरच तुम्हाला यशस्वी मानलं जाईल.
-- महात्मा गांधी,
राष्ट्रपिता.
68) अपार कष्ट आपल्या कामाप्रती अविचल निष्ठा आणि आपण जिंकू किंवा अपयशी ठरू याची तमा न बाळगता आपल्या कामात १०० टक्के झोकून देण्याचा, पूर्ण शक्ती लावून ते काम करण्याचा निश्चय या गोष्टीतूनच यश साकारत जातं. म्हणूनच यशस्वी व्यक्ती आणि इतरांच्यातला फरक काय? इतरांकडे क्षमता नसतात, ताकद नसते किंवा ज्ञान नसते असं नाही. पण यशस्वी व्यक्तींमध्ये जी आंतरिक तळमळ आणि इच्छा असते, त्याची कमी इतरांमध्ये असते.
--- विन्सेट (विन्सी) लोम्बार्डी, ख्यातनाम फूटबॉलपटू.
69) यशाची ‘रेसिपी’: नम्रता अंगी असावी, जे काम तुमच्यावर सोपवलंय, ते पार पाडण्याची मानसिक तयारी असावी, उत्साही व व्यवस्थित राहावं. कधीही कुणाबद्दल द्वेषभावना नसावी, नेहमी प्रामाणिक राहा. तरच तुम्ही इतरांशी प्रामाणिकपणे वागू शकाल, इतरांच्या मदतीला तत्पर राहा, स्वतच्या कामात रस घ्या, कधी स्वतला इतरांच्या नजरेत दयनीय बनवू नका, इतरांची स्तुती करण्यात तत्परता दाखवा. मत्रीत निष्ठा असू द्या, पूर्वग्रह झटकून टाका, स्वतंत्र वृत्ती अंगी बाणवा..
---बनॉर्ड बॅरूच, अर्थतज्ज्ञ व राजकीय सल्लागार.
70) समाजाला हितकारक ठरतील अशा कृती करणं आणि त्या प्रक्रियेचा आनंद घेणं म्हणजे यश! यावर तुमचा विश्वास असेल, अन् ही व्याख्या तुम्ही मनापासून स्वीकारत असाल, तर ‘यश’ तुमचंच आहे.
--केली किम.
71) कमकुवत व्यक्ती सोबतच शत्रुत्व सर्वात जास्त धोकादायक असते कारण कि तो अशावेळी वार करतो ज्यावेळेची आपण कल्पना देखील केलेली नसते.
72) तुमचे शांत मन हे तुमच्या आव्हानांविरुद्धचे परम शस्त्र आहे.--- ब्रायंट मॅकगिल.
73) चिंता आणि विश्वास या दोन्हीसाठी तुमच्या मनात पुरेशी जागा नाही. तिथे कोणाला राहायचे ते तुम्ही ठरवले पाहिजे.
74) प्रत्येक व्यक्तीकडे चांगल्या-वाईट शब्दांचा साठा असतो, पण त्यांचा योग्य वापर त्याला शहाणपणाच्या पातळीवर घेऊन जातो.
75) जी गोष्ट गरजेची आहे त्यापासून सुरुवात करा, त्यानंतर जे शक्य आहे ते करा; आणि अचानक तुमच्याने जे अशक्य वाटत होते तेही घडून जाईल.
76) जो तुमची खूप काळजी घेतो त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करताना तुम्ही हिरा गमावला.
77) कमी नाती निर्माण करा पण ती मनापासून जपा, कारण लोक चांगल्याच्या शोधात सर्वोत्तम गमावतात.
78) जिवाच्या आकांताने घेतलेली झेप आयुष्य तारते..
तशी आयुष्यातली प्रत्येक गोष्ट
जीव ओतून करणारे..
नेहमी यशस्वी ठरतात..!
79) परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तो नियम
आपण सर्वांनीच न घाबरता मान्य करायला हवा. या प्रत्येक परिवर्तनाला सामोरे जाणे, ते स्वीकारणे हेच बुद्धिमत्तेचे उत्तम लक्षण मानायला हवे.
80) माणसांचा संग्रह करणे हे पुस्तकांचा संग्रह
करण्यापेक्षा अवघड असते. यात फरक असा
असतो की, पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची
गुंतवणूक हवी असते, तर माणसांच्या संग्रहासाठी
भावनांची कदर करावी लागते.
81) नातेसंबंधांचा विचार हा हृदयातूनच करायला हवा.
त्याला भावनेचा ओलावा द्यावा लागतो. तो विचार
जेव्हा मेंदूमधून सुरू होतो, तेव्हा आपोआपच
देवघेवीचा हिशेब मांडला जाऊ लागतो.
82) यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशीबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे दिसून येईल.
83) जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक 'निंदक' आणि दुसरा 'स्पर्धक' कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात.
84) जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक 'निंदक' आणि दुसरा 'स्पर्धक' कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात.
85) हाव सोडली की, मोह संपतो
आणि मोह संपला की, दुःख संपते.
86) कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही,
फक्त एका घावाची गरज आहे.
जर बोटावर बसला, तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो.
87)शब्द मोफतचं असतातं,
पण त्यांच्या वापरावर अवलंबून
असतं की, त्याची किंमत आपल्याला
मिळेल की मोजावी लागेलं...
88) पुन्हा सुरुवात करण्यास घाबरू नका.
"यावेळी, तुम्ही सुरवातीपासून सुरुवात करत नाही आहात, तुम्ही अनुभवापासून सुरुवात करत आहात.
89) उद्योग, साहस, धैर्य, बुध्दी, शक्ती, पराक्रम व प्रयत्न या सात गोष्टी जिथे एकत्र येतात तेथे देवसुध्दा साहाय्य करतो.
90) हमखास यश देणारे टॉनिक म्हणजे आत्मविश्वास होय.
91) ज्याच्याजवळ आत्मविश्वास आहे त्याचे जीवन नक्कीच झकास.
92) निश्चित ध्येय डोळ्यांपुढे नसेल तर वाऱ्याबरोबर उडणाऱ्या पाचोळ्याप्रमाणे आपले जीवन फोल ठरेल.
93) आपले निश्चित ध्येय गाठण्यासाठी प्रतिज्ञा करा. पण ती प्रतिज्ञा पोपटपंची स्वरूपाची नसावी. तळमळीने व श्रध्देने केलेली असावी.
94) तुम्ही जीवनातील उत्कृष्टतेच्या जितके जवळ जाल तितके मित्र तुम्ही गमवत जाल.
जेव्हा तुम्ही साधारण विचारसरणीचे असता तेव्हा लोक तुमच्यावर प्रेम करतात कारण ते त्यांना आरामदायक बनवते.
परंतु जेव्हा तुम्ही महान विचारांचा पाठलाग करता तेव्हा ती गोष्ट लोकांना अस्वस्थ करते...कारण त्यांचे भ्रम तुटले जातात.
तेव्हा जीवनाच्या प्रवासात काही माणसे गमावण्या साठी तयार रहा..
-- टोनी ए. गॅस्किन्स जूनियर.
95) चांगले विचार वाचल्यावर कदाचित भाग्य बदलत नसेल?... पण प्रेरक विचारांमुळे कार्यात उर्जा निश्चितच मिळेल!...
96) खेळाच्या शंभर शिक्षकांपेक्षा खिलाडू वृत्तीने खेळणारा एक खेळाडू जास्त महत्त्वाचा असतो. -- न्यूट रॉकने, क्रीडा प्रशिक्षक.
97) ज्यांच्याकडे निश्चित ध्येय असतं,असे लोक फार कमी असतातपण तेच मोठ्या प्रमाणात यशस्वी
होताना दिसतात.
-ध्येयामागील ध्येय या पुस्तकातून.
98) कोणती वेळ कशी येईल सागता येत नाही.माणुसकी जपा.भीक मागणाऱ्या बाईचं उष्ट पाणी सुद्धा प्यावं लागतं . संकट समयी श्रीमंत-गरीब, जात-पात काही नसते. माणुसकी हीच सर्वश्रेष्ठ.*
99) मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला हे आहे. -- जॉन रस्कीन.
100) लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते, मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो, किंवा गैरसमजातून असो.
101) आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.
102) 1) ज्ञान मिळवा म्हणजे धैर्य आणि आत्मविश्वास आपोआपच तुमच्या मदतीला येईल .
2) यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे .
3) समस्या हीच यशाचे प्रवेशद्वार आहे .
5) सुकलेले फूल सुगंध देऊन जातात ,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात ,
प्रत्येकाची ओळख असतेच निराळी ,
कोणी मैत्रीत प्रेम तर ,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात .
अपेक्षा स्वताकढुनच ठेवा ,
समोरच्यांकडून नाही .
7) चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील ; तर ...जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही
तर तुम्हाला दुसरे कोणीतरी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास कामाला ठेवेल .
-- धीरूभाई अंबानी .
13) प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे; तर गती हा त्याचा आत्मा आहे.
14) जीवनात अनंत अडचणी असतात, पण ओठांवर हास्य ठेवा,
कारण ....कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच.
मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे.
15) तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर लोक हसत नसतील,
तर तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.
16) स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवितात , ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.
17) सद्सद्विवेक बुद्धीने मनाला जो बरोबर आहे असे
पटते, त्याप्रमाणे जो वागतो, ती व्यक्ती हुशार
समजावी .
18) शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे व आत्मा
ज्ञानामुळे पवित्र राहतो.
19) काही चांगलं करावसं वाटेल त्यावेळी ते लगेच करा; पण जेंव्हा कोणाची वाईट करायची इच्छा होईल तेंव्हा थांबून आधी विचार करा.
20) जेथे आणि ज्या मातीवर आपण जन्म घेतो, त्या मातीवरील प्रेम आणि निष्ठा हि असीम असते.
21) इतरांकडून कमीत कमी "अपेक्षा"
आणि
स्वतः कडून जास्तीत जास्त "तडजोड"
या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात.
22) लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चुक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी
किती कष्ट घ्यावे लागतात यशाच शिखर चढण्यासाठी.....
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो
वरून खाली पडण्यासाठी.
23) अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात.
24) धैर्य नेहमीच गर्जना करत नाही. कधीकधी धैर्य म्हणजे दिवसाच्या शेवटी लहान आवाज जो म्हणतो की मी उद्या पुन्हा प्रयत्न करेन. --- अॅनी रॅडमाचेर.
25) दुसऱ्याला देण्यासाठी आपल्या कडे काही नसले तरी चालेल पण... सन्मान नक्कीच देता आला पाहिजे.
26)* पराभवाला घाबरु नका; एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. नेहमी लक्षात ठैवा की जे लोक तुम्हाला खाली खेचतात ते तुमच्यापेक्षा खालच्या पातळीवरचे असतात. - बिल गेट्स.
PLEASE DONATE TO THE BLOGGER.
PAYTM 9637867159. .
PAYPAL javedpjn@gmail.com
THANKS FOR READING. LIKE SHARE AND COMMENT. KEEP VISITING.
x

Comments
Post a Comment